पट्टण कोडोलीची विठ्ठल-बिरदेव यात्रा
पट्टण कोडोलीची विठ्ठल-बिरदेव यात्रा आपले मेंढपाळ बांधव वर्षनुवर्षं डोंगर खोऱ्यात मेंढ्या राखत असतात. या मेंढ्या राखताना त्यांचे व त्यांच्या मेंढ्यांचे वाईट अदृश्य शक्ती पासून संरक्षण व्हावे म्हणून ते बिरोबा देवाला पूजतात. बिरोबा म्हणजे शिवाचा अवतार. या बिरोबा देवाची भारतभरात एकूण मुख्य १२ ठाणी आहेत, त्यातील ६ महाराष्ट्र आहेत आणि या सहा पैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण-कोडोलीचा(ता,हतकणंगले) विठ्ठल-बिरदेव. पट्टण कोडोलीच्या विठ्ठल-बिरदेव यात्रे बद्दल थोडक्यात सांगायचे म्हटले तर, हि यात्रा म्हणजे अहिंसेचा संदेश देणारी यात्रा. महाराष्ट्रातील धनगर समाज हा मुख्यत्वेकरुन मांसाहारी आहे पण या समाजाची सर्वात मोठी यात्रा जेथे भरते तो देव मात्र पुर्णपणे शाकाहारी आणी अहिंसेचा प्रचार करणारा आहे, तो देव म्हणजे पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव. विठ्ठल तर पंढरपूरचाच आहे आणी बिरदेव शिवांचा अवतार आहे. हे दोघे हरि-हर धनगर समजाबरोबर बारा बलुतेदार समाजाला पूज्य आहेत, साधारणतः महाराष्ट्रातल्या लोकदैवतांच्या जत्रा म्हणजे त्यात मांसाहार ठरलेला असतोच पण या यात्रेत मात्र धनगर समाजाचे वर्चस्व असूनही ...